आर्थिकदेश-विदेशविशेषशैक्षणिकसामाजिक

गुजरातचे मोधेरा देशातील पहिले ‘सौरऊर्जा ग्राम’ ; पंतप्रधान मोदी यांची घोषणा; १४,००० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन…

गुजरात: मोधेरा मेहसाणा जिल्ह्यातील मोधेरा हे देशातील पहिले १०० टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव ठरले आहे. येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.
सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आता ‘सौरऊर्जा ग्राम’ म्हणून ओळखले जाईल, असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पंतप्रधान तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या वेळी ते १४ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. याअंतर्गत रविवारी ‘सौरऊर्जा ग्राम’ असलेल्या मोधेरामध्ये त्यांची सभा झाली. ‘मोधेराने परकीय आक्रमणांमुळे आतापर्यंत अनेक अनन्वित अत्याचार सहन केले. मात्र आता आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवत आधुनिकतेची कास धरून गावाचा विकास होत आहे,’ असे पंतप्रधान म्हणाले.
सूर्यमंदिर ते सौरऊर्जा
मोधेरामध्ये पुष्पावती नदीच्या काठावर १०व्या शतकात बांधलेले सूर्यमंदिर आहे. तिथेच आता मोकळय़ा जमिनीवरील सौरऊर्जा प्रकल्प तसेच १,३०० छपरांवर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. त्यातून ‘बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टीम’मध्ये वीज साठवली जाते आणि नंतर तिचे गावात वितरण होते.
गुजरातच्या जनतेने माझी जात किंवा राजकीय पार्श्वभूमी न बघता दोन दशके मला आशीर्वाद दिला, विश्वास दाखवला. हा आशीर्वादच माझी काम करण्याची ऊर्जा आहे आणि त्यात दिवसागणिक वाढच होत आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button